Apple & Lemon Detox Water – वजन कमी करायचंय? मग ही मस्त रेसिपी नक्की करून बघा!
वजन कमी करणं ही केवळ एक शारीरिक गरज नाही, तर ती मानसिक तयारीची आणि सवयींच्या बदलाची एक प्रक्रिया आहे. मी स्वतः गेल्या काही महिन्यांपासून माझ्या तब्येतीकडे लक्ष देतोय. पहिल्या काही दिवसांत जाणवलं – डाएट आणि व्यायाम यांइतकंच महत्त्व 'हायड्रेशन'लाही आहे!
म्हणजे काय?
सोप्या भाषेत सांगायचं तर – पुरेसं पाणी पिणं!
आपण खूप वेळा ऐकतो की रोज किमान २ ते २.५ लिटर पाणी प्यावं. पण खरं सांगतो, ही सवय लावणं मला खूप कठीण गेलं. ऑफिसमध्ये, घरात, प्रवासात – पाणी प्यायचं लक्षच राहत नाही. त्यामुळे शरीर थकल्यासारखं वाटायचं, त्वचा कोरडी पडायची आणि पचनात गडबड व्हायची.
मग मी काही वेगळं करायचं ठरवलं – आणि तिथून माझी Detox Water ची सफर सुरू झाली.
माझ्या या लेखात आज मी तुमच्यासोबत शेअर करतोय माझी एक आवडती रेसिपी – Apple & Lemon Detox Water
का करावी Detox Water ची सुरुवात?
साधं पाणी पिणं कंटाळवाणं वाटतंय?
मग त्यात थोडा चवदार, पौष्टिक आणि नैसर्गिक टच द्या.
डिटॉक्स वॉटर म्हणजे असं पाणी, ज्यात तुम्ही फळं, मसाले, हर्ब्स यांचं मिश्रण करता. हे पाणी केवळ स्वादिष्ट नसतं, तर आरोग्यदायी गुणधर्मांनी भरलेलं असतं.
माझा अनुभव – सुरुवात कशी केली?
सुरुवातीला मीही अनेक Instagram रील्स, Pinterest च्या पोस्ट्स आणि Health blogs पाहून Detox Water चा प्रयत्न केला. पण अनेकदा जास्त क्लिष्ट रेसिपीज पाहून कंटाळा यायचा.
मग मी ठरवलं – सुरुवात करू साध्या, घरच्या घरी करता येणाऱ्या रेसिपीपासून.
यातलीच एक होती ही – Apple & Lemon Detox Water
साहित्य:
-
१/२ सफरचंदाचे बारीक काप – मी शक्यतो लाल सफरचंद वापरतो, कारण ते थोडं गोडसर लागतं.
-
१ चमचा लिंबाचा रस – ताजं लिंबू पिळलेलं, बाटलीतील नाही!
-
१ ते २ चमचे मध – नैसर्गिक गोडवा आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म
-
१ चमचा Apple Cider Vinegar (ACV) – Raw, unfiltered असलेलं घेणं चांगलं
-
३५० मिली थंड पाणी – थोडं फ्रिजचं पाणी किंवा रूम टेंपरेचरचं, जसं तुम्हाला आवडेल

कृती:
-
सर्वप्रथम मिक्सरमध्ये मध, लिंबाचा रस आणि ACV टाका.
-
हे एकजीव करून घ्या.
-
नंतर ते मिश्रण एका ग्लास/बॉटलमध्ये ओता.
-
त्यात बारीक चिरलेले सफरचंदाचे काप टाका.
-
वरून थंड पाणी टाका आणि नीट हलवा.
सर्वप्रथम मिक्सरमध्ये मध, लिंबाचा रस आणि ACV टाका.
हे एकजीव करून घ्या.
नंतर ते मिश्रण एका ग्लास/बॉटलमध्ये ओता.
त्यात बारीक चिरलेले सफरचंदाचे काप टाका.
वरून थंड पाणी टाका आणि नीट हलवा.
झालं तुमचं Detox Water तयार! मी स्वतः हे सकाळी उठल्यावर किंवा दुपारी जेवणाच्या आधी पितो. पचनाला मदत होते, आणि शरीर हलकं हलकं वाटतं.
आरोग्यदायी फायदे (मी स्वतः अनुभवलंय)
🍋 लिंबू:
-
रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो.
-
पचन सुधारतो – जेवणानंतर होणारी जडपणा नाहीसा होतो.
-
त्वचेसाठी छान – मी अनुभवलेलं म्हणजे, pimples कमी झाले आणि glow वाढला!
रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो.
पचन सुधारतो – जेवणानंतर होणारी जडपणा नाहीसा होतो.
त्वचेसाठी छान – मी अनुभवलेलं म्हणजे, pimples कमी झाले आणि glow वाढला!
🍎 सफरचंद:
-
फायबरमुळे पोट साफ होण्यास मदत होते.
-
मी त्याच्या सालीसकट वापरतो – त्यामुळे अजून फायदे मिळतात.
-
थोडासा गोडवा Detox Water ला देतो – जेणेकरून मध कमी लागतो.
फायबरमुळे पोट साफ होण्यास मदत होते.
मी त्याच्या सालीसकट वापरतो – त्यामुळे अजून फायदे मिळतात.
थोडासा गोडवा Detox Water ला देतो – जेणेकरून मध कमी लागतो.
🥄 Apple Cider Vinegar (ACV):
-
सुरुवातीला चव थोडीशी तिखट/strong वाटू शकते, पण त्याचे फायदे अमुल्य आहेत.
-
माझ्या personally अनुभवात – acidity कमी झाली, जे माझ्या सततच्या समस्या होत्या.
-
metabolism सुधारला – म्हणजेच वजन कमी होण्याला मदत.

माझं निरीक्षण (१ महिना नंतर)
मी रोज सकाळी हे Apple & Lemon Detox Water प्यायला सुरुवात केली आणि त्याचे काही महत्वाचे फायदे मला जाणवले:
-
भूक कमी लागायला लागली – विशेषतः junk food ची cravings कमी झाल्या.
-
स्किन क्लीन वाटू लागली – एक नैसर्गिक glow आला.
-
पचन सुधारलं – जेवणानंतर गॅस, फुगणं यासारख्या तक्रारी कमी झाल्या.
-
थकवा कमी झाला – दिवसभर फ्रेश वाटायला लागलं.
-
Weight loss? Yes! – २.५ किलो वजन कमी झालं एका महिन्यात. फक्त Detox Water मुळे नाही, पण हा त्यातला एक महत्त्वाचा भाग होता.
काही टिप्स:
-
ACV नसेल तर पहिल्या काही दिवसांसाठी वगळू शकता. नंतर हळूहळू समाविष्ट करा.
-
Detox Water ताजं असतानाच प्यायचं, फार वेळ फ्रीजमध्ये ठेवू नका.
-
शरीर ऐका – काहींना सुरुवातीला acid reflux जाणवतो, त्यामुळे प्रमाण सांभाळा.
-
एखादी दिवशी कंटाळा आला, तर त्यात थोडं मिंट/आलं घालून वेगळा चव ट्राय करा.

Comments
Post a Comment