श्रीखंड - खास गुढीपाडव्यानिमित्य - Maharashtrian & Gujrathi Dessert
नमस्कार मंडळी Image Taken from wiki .. हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेछ्या - सर्वाना शुभ गुढीपाडवा.. ह्या गुढीपाडव्याच्या निमित्याने आपणा सर्वाना आवडणारा असा गोड पदार्थाची कृति अर्थात श्रीखंडाची recipe लिहित आहे.. श्रीखंड हा प्रकार भारतात खास करून महाराष्ट्रात आणि गुजराथमध्ये प्रसिद्ध आहे श्रीखंड बनविण्यास लागणारे साहित्य खालीलप्रमाणे : चक्का २५० ग्रॅम / ताजे दही ५०० ग्रॅम कापडी रुमाल पिठीसाखर २५० ग्रॅम थोडी कमी जास्त चावी प्रमाणे छोटी वाटी कोमट दुध २ चिमूट केशर सुका मेवा - पिस्ता काजू चे बारीक तुकडे अथवा किस २ चमचे चिमूटभर वेलदोड्याची पावडर चिमूटभर जायफळ पावडर कृती : चक्का घरी बनवण्यासाठी - ताजे दही रुमालात घेऊन त्यातले सर्व पाणी कडून टाकावे आणि उरलेलं दही त्याच रुमालात गाठ मारून ८ ते १२ तास निथळत ठेवावे. चक्का विकत आणल्यास तो लगेच वापरण्यायोग्य असतो. कोमट दुधात १ चिमूट केशर टाकून वाटी बाजूला ठेवावी ज्या...