श्रीखंड - खास गुढीपाडव्यानिमित्य - Maharashtrian & Gujrathi Dessert
नमस्कार मंडळी
![]() |
| Image Taken from wiki |
.. हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेछ्या - सर्वाना शुभ गुढीपाडवा..
श्रीखंड हा प्रकार भारतात खास करून महाराष्ट्रात आणि गुजराथमध्ये प्रसिद्ध आहे
श्रीखंड बनविण्यास लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :
कृती :
- चक्का घरी बनवण्यासाठी - ताजे दही रुमालात घेऊन त्यातले सर्व पाणी कडून टाकावे आणि उरलेलं दही त्याच रुमालात गाठ मारून ८ ते १२ तास निथळत ठेवावे.
- चक्का विकत आणल्यास तो लगेच वापरण्यायोग्य असतो.
- कोमट दुधात १ चिमूट केशर टाकून वाटी बाजूला ठेवावी ज्याने केशराचा रंग दुधात उतरेन.
- चक्का १ भांड्यात काढून घ्यावा त्यात साखर टाकावी आणि दूध टाकून मिश्रण १ डावाने (spatula ) हलवून एकजीव करावे, मिश्रण एकत्र करत असतांना त्यात वेलदोड्याची आणि जायफळ पावडर टाकवी
- मिश्रण एकजीव झाले कि त्यात केशराची केशरी झाक(रंग ) दिसू लागते मिश्रण हे चक्क्या पेक्षा थोडे पातळ असते .
- तयार झालेले श्रीखंड थोड्या वेळासाठी अथवा वाढेपर्यंत (serve) फ्रिज मध्ये ठेवावे.
- हे श्रीखंड इंग्लिशमध्ये "No Cook No bake dessert" म्हणून ओळखले जाते.


Comments
Post a Comment