सब्जा सरबत आणि त्याचे शारीरिक फायदे - Basil Seed cold drinks and its health benifits

    उन्हाळा म्हंटल की  आठवतं  लहानपणी  उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली की आम्ही भावंड सगळे आमच्या घरी कल्याणच्या वाड्यात एकत्र यायचो, तेव्हा टिव्ही व पत्याचे डाव रंगायचे, ना  ए.सी. ना  कूलर पण वाड्यात त्याचा कधी त्रास झालाच नाही आणि अगदीच लाईट गेले तर पुठ्याचा पंखा असायचाच आजी थोडा आम्हाला थोडा तिला वारा घालायची त्यातच आम्ही एकदम Cool असायचो. 

    आणि आता उन्हाळा आला कि टिव्हीवर सरबत, आइसक्रीम, कुल्फी  चुभती गर्मी, सनस्क्रीन लोशन अणि तूफानीच्या  जाहिरातीचा भडिमार सुरु होतो, अशा वेळी आठवण होते त्या लहानपणी दुपारी बर्फाचा गोळा किव्हा रात्री कधीतरी पटेल नाहीतर तायडेच आईस्क्रीमची त्या वेळी बाकीचे ब्रँड माहीतच नव्हते.

गोळेवाल्याकडच्या सब्जाच्या सरबताच कुतूहल वाटायचं,  तेव्हा फक्त एवढाच कळायचं कि  हे जे काही आहे ते फक्त ह्या गोळेवाल्याकडेच मिळत..पण जस समजायला लागला तेव्हा ह्या सब्जाचे  महत्व कळायला लागल आणि ह्या सब्जाचे ( basil seeds) खूप फायदे आहेत. 
  • सब्जा हे वजन कमी करायला मदत करते. 
  • सब्जा हे शरीरातील वाढलेली उष्णता कमी करायला शरीर थंड ठेवायला मदत करते. 
  • सब्जाने पित्ताचा त्रास कमी होतो. 
  • रक्तातील साखरेचं प्रमाण योग्य ठेवण्यास मदत करत. 
आणि असे अनेक फायदे  आहेत . 



तर तुम्ही हि कोणतही सरबत कराल तेव्हा त्यात सब्जा वापरा. 

  • सब्जाचे बी कसे वापरावे ?
     - कोणत्याही सरबताची तयारी करायला घेण्याअगोदर  जास्तीत जास्त ५ मिनिटे सब्जाचं १ किव्हा २ चमचे बी         १ वाटीभर पाण्यात भिजू  द्यावे, सब्जाचे बी स्वतःच्या २ ते ३ पट फुलते 
     - ते भिजलेले बी सरबतात, फालुद्यात टाकून  वापरू शकतो 
     - नुसते रोजच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत थोडे बे टाकूनही ते पाणी पिऊ शकता सब्जाच्या बीला वेगळी          चव नसते. 
  • सब्जाचे बी कुठे मिळेल?
    - कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात मिळू शकते 
    - अथवा तुम्ही ते ऑनलाईन पण मागवू शकता (Online Basil Seeds)

मला विचाराल तर बाजारातील तुफानी पेयांपेक्षा कोकम सरबत, लिंबू सरबत, ताक, उसाचा रस, आवळा सरबत  घ्या थंड पण आरोग्य पण ...

Be Cool ... Be Healthy

- विजय 



Comments

Popular posts from this blog

How I Turned My Boring Oats Into a Delicious Indian Dish

Apple & Lemon Detox Water – वजन कमी करायचंय? मग ही मस्त रेसिपी नक्की करून बघा!